वेगळेपणामुळेच ‘बुलडाणा लाइव्‍ह’ला आजचा मान!; ॲड. काझी यांचे गौरवोद्‌गार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा लाइव्हचे वेगळेपण वारंवार दिसून येते. याच वेगळेपणामुळे बुलडाणा लाइव्हने अल्पावधीत मोठी वाचकसंख्या आणि जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी काढले. बुलडाणा लाइव्हच्या बुलडाणा येथील विभागीय कार्यालयाला ॲड. काझी यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. लाइव्ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे यांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा लाइव्‍हचे वेगळेपण वारंवार दिसून येते. याच वेगळेपणामुळे बुलडाणा लाइव्‍हने अल्‍पावधीत मोठी वाचकसंख्या आणि जिल्ह्यात मानाचे स्‍थान मिळवले, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी काढले.

बुलडाणा लाइव्‍हच्‍या बुलडाणा येथील विभागीय कार्यालयाला ॲड. काझी यांनी भेट दिली. त्‍यावेळी ते बोलत होते. लाइव्‍ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे, जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ, विशेष प्रतिनिधी (घाटाखालील भाग) ज्ञानेश्वर ताकोते, व्‍यवस्‍थापक अजय राजगुरे यांची उपस्‍थिती होती. दर्जेदार आणि विश्वासार्ह पत्रकारिता बुलडाणा लाइव्‍हने अशीच सुरूच ठेवावी, अशी अपेक्षा यावेळी ॲड. काझी यांनी व्‍यक्‍त केली. जिल्‍हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी बुलडाणा लाइव्‍हची वाटचाल विषद केली. बुलडाणा लाइव्‍हमुळे जिल्ह्याच्‍या बाहेर असलेले अगदी विदेशातील बुलडाणेकरही आपल्या मातीशी पुन्‍हा एकरूप झाले आहेत. आपल्या जिल्ह्यातील ताज्‍या बातम्‍या त्‍यांना तिथे बसून वाचता येत असल्याचे त्‍यांनी सांगितले.