वेळीच माणसे धावून आले म्‍हणून वाचली ‘ती’… चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रानडुकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज शिवारात काल, 4 मार्चच्या दुपारी 1 च्या सुमारास घडली.खंडाळा मकरध्वज येथील सौ. सीमा भगवान सिताफळे या वायझडी धरणाजवळ असलेल्या त्यांच्या शेतात गेल्या होत्या. त्याचवेळी शेतात दडून बसलेल्या रानडुकरांनी हैदोस घालायला सुरुवात केली. त्यात एका डुकराने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रानडुकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज शिवारात काल, 4 मार्चच्‍या दुपारी 1 च्‍या सुमारास घडली.
खंडाळा मकरध्वज येथील सौ. सीमा भगवान सिताफळे या वायझडी धरणाजवळ असलेल्या त्यांच्या शेतात गेल्या होत्या. त्याचवेळी शेतात दडून बसलेल्या रानडुकरांनी हैदोस घालायला सुरुवात केली. त्यात एका डुकराने सौ. सीमा यांच्यावर जीवघेणा हल्ला करीत त्यांच्या पायाचा चावा घेतला व गंभीर जखमी केली.महिलेने प्रतिकार करीत आरडा ओरड केल्याने शेतशिवारातील माणसे धावून आले. त्यांनी रानडुकरांना हुसकावून लावले. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला बुलडाण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.