वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक रस्त्यातच करत होते “ते’ काम!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव सामान्य रुग्णालयात बनावट पॉझिटिव्ह अहवाल तयार करणाऱ्यांचे बिंग डॉक्टरांनीच फोडल्यानंतर आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. खामगाव शहर पोलिसांनी कंत्राटी रुग्णवाहिका चालक राहुल चौधरी व खामगाव सामान्य रुग्णालयातील कक्षसेवक उमेश अवचार यांना 6 जुलैच्या रात्री अटक केली आहे. विम्याचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शिवांगी …
 
वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक रस्त्यातच करत होते “ते’ काम!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव सामान्य रुग्‍णालयात बनावट पॉझिटिव्ह अहवाल तयार करणाऱ्यांचे बिंग डॉक्‍टरांनीच फोडल्‍यानंतर आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. खामगाव शहर पोलिसांनी कंत्राटी रुग्‍णवाहिका चालक राहुल चौधरी व खामगाव सामान्य रुग्णालयातील कक्षसेवक उमेश अवचार यांना 6 जुलैच्या रात्री अटक केली आहे.

विम्याचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शिवांगी बेकर्समधील काही कामगार बनावट पॉझिटिव्ह अहवाल तयार करण्यासाठी वॉर्डबॉयसोबत हातमिळवणी करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात 1 जुलै रोजी खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश टापरे यांनी तक्रार दिली होती. 1 जुलै रोजीच सामान्य रुग्णालयाचा कंत्राटी कामगार विजय राखोंडे याला अटक करण्यात आली होती. त्‍याला या कामासाठी पैसे देणारा चंद्रकांत उमप व कामगार प्रकाश सुलताने यांनाही अटक करण्यात आली होती. त्‍यानंतर काल चौधरी आणि अवचार यांच्‍या अटकेमुळे आरोपींची संख्या पाचवर गेली आहे. तपासादरम्यान यात अनेक धक्कादायक खुलासे होत असून, चौधरी आणि उमप हे बुलडाणा येथे स्वॅब घेऊन जाताना अदलाबदल करत होते, असे समोर येत आहे. याप्रकरणी आणखी चौकशी सुरू असून, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.