व्वा… जिल्ह्यात अवघे 865 कोरोनाबाधित उरले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 जूनला दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 865 कोरोना रुग्णच उपचार घेत आहे. अगदी गेल्याच महिन्यात हा आकडा अगदी 7 हजारांच्या घरात गेला होता. दिवसभरात नव्या 89 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, 193 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, तर उपचारादरम्यान चिखली येथील 80 वर्षीय …
 
व्वा… जिल्ह्यात अवघे 865 कोरोनाबाधित उरले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 जूनला दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 865 कोरोना रुग्‍णच उपचार घेत आहे. अगदी गेल्याच महिन्यात हा आकडा अगदी 7 हजारांच्‍या घरात गेला होता. दिवसभरात नव्या 89 पॉझिटिव्ह रुग्‍णांची भर पडली असून, 193 रुग्णांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे, तर उपचारादरम्यान चिखली येथील 80 वर्षीय पुरुष व काटोडा (ता. चिखली) येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2208 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2119 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 676 तर रॅपिड टेस्टमधील 1443 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर :4, बुलडाणा तालुका : साखळी 2, सव 1, कोलवड 3, मासरूळ 1, दहीद खुर्द 1, चांडोळ 1, सुंदरखेड 1, मोताळा तालुका : तालखेड 2, कोथळी 1, खामगाव शहर :1, खामगाव तालुका : पळशी बुद्रूक 1, घाटपुरी 1, शेगाव शहर : 4, शेगाव तालुका : शिरसगाव निळे 1, जानोरी 1, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका :2, टाकरखेड भा 4, बायगाव 2, देऊळगाव मही 2, अंभोरा 1, काळेगाव 1, तुळजापूर 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : खोर 1, शेलगाव 1, माळशेंबा 1, खैरव 1, संग्रामपूर तालुका : पलसोडा 1, धामणगाव 1, निवाणा 1, उमरा 1, बावनबीर 1, सगोडा 2, वसाडी 1, सिंदखेड राजा तालुका : दुसरबीड 1, नसिराबाद 1, पिंपरखेड 1, सावखेड तेजन 1, मेहकर शहर :1, मेहकर तालुका : जानेफळ 4, बरटाळा 1, बऱ्हाई 1, अंत्री देशमुख 2, चायगाव 1, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : जामोद 1, नांदुरा शहर : 5, नांदुरा तालुका : जिगाव 1, दादगाव 1, टाकरखेड 1, अंबोडा 1, लोणार शहर :1, लोणार तालुका : गुजखेड 1, सावरगाव मुंढे 1, शिंदी 1, किनगाव जट्टू 1, परजिल्हा अंदूरा ता. बाळापूर 1, दहीहांडा जि. अकोला 1,तेल्हारा 1, केनवड ता. मालेगाव 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 89 रुग्ण आढळले आहे.

बळींचा आकडा 633 वर
आज 193 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 506539 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84113 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 942 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 506539 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85619 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 865 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 633 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.