व्हिडिओ कॉल करून 13 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल; मलकापुरात दूध डेअरी चालकाचा प्रताप, पोलिसांनी केली अटक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोबाइलवर व्हिडिओ कॉल करून 13 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार मलकापूर शहरात समोर आला आहे. या प्रकरणी 28 वर्षीय दूध डेअरी चालकाविरोधात मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुलडाणा रोडवरील ओंकारनगरातील मुलगी गॅलरीत अभ्यास करत असताना शेजारील श्रीकृष्ण डेअरीच्या संचालकाने तिचा मोबाइल नंबर मिळवून तिला व्हिडिओ काॅल करून अश्लील हावभाव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोबाइलवर व्हिडिओ कॉल करून 13 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार मलकापूर शहरात समोर आला आहे. या प्रकरणी 28 वर्षीय दूध डेअरी चालकाविरोधात मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुलडाणा रोडवरील ओंकारनगरातील मुलगी गॅलरीत अभ्यास करत असताना शेजारील श्रीकृष्ण डेअरीच्या संचालकाने तिचा मोबाइल नंबर मिळवून तिला व्हिडिओ काॅल करून अश्लील हावभाव केले. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील रहिवासी स्वप्नील लक्ष्मण कोल्हे (28) याने ओंकारनगरात रोडवर भाड्याने दुकान घेऊन श्रीकृष्ण डेअरीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्याच  दुकानासमोर 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी रोज गॅलरीत अभ्यास करत होती. त्याने त्या मुलीचा मोबाइल नंबर मिळवून तिच्याशी व्हिडिओ कॉल करून अश्लील संभाषण करून तिला ब्लॅकमेल करत असल्याचे मुलीच्या मोठ्या आईने बघितले. याबाबतची माहिती मुलीच्या वडिलांना दिल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली होती. तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक स्मिता म्हसाये करीत आहेत.