व्हॅलेंटाइन डेसाठी बाहेर पडाल तर बजरंग दल देणार फटके!; जिल्हा संयोजकांचा इशारा

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. काल रोज डे होता, आज प्रपोज डे आहे. कोरोना -लॉकडाऊनमुळे वाढलेल्या दुराव्याला दूर करण्यासाठी प्रेमविरांनी आता चांगलीच तयारी केल्याचे दिसत आहे. मात्र व्हॅलेंटाईन डे साजरा करणे भारतीय संस्कृतीत बसत नाही. हिंदू संस्कृतीची विडंबना आणि प्रेमाचे असले घाणेरडे प्रदर्शन खपवून घेणार नसल्याचा इशारा …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. काल रोज डे होता, आज प्रपोज डे आहे. कोरोना -लॉकडाऊनमुळे वाढलेल्या दुराव्याला दूर करण्यासाठी प्रेमविरांनी आता चांगलीच तयारी केल्याचे दिसत आहे. मात्र व्हॅलेंटाईन डे साजरा करणे भारतीय संस्कृतीत बसत नाही. हिंदू संस्कृतीची विडंबना आणि प्रेमाचे असले घाणेरडे प्रदर्शन खपवून घेणार नसल्याचा इशारा बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रवीण अंभोरे यांनी दिला आहे.
7 फेब्रुवारीच्यारोज डे पासून सुरुवात होणारा व्हॅलेंटाईन आठवडा 14 फेब्रुवारीपर्यंत चालतो. त्या दरम्यान प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटी 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.
गुलाबाच्या फुलाला वाढती मागणी
दरम्यान प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलाला तरुणाई अधिक महत्व देते. प्रपोज करण्यासाठी तसेच आवडत्या व्यक्तीच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी गुलाब पुष्प देण्याची प्रथा तरुणाईत असल्याने या आठवड्यात गुलाबाच्या फुलांना चांगलीच मागणी असल्याचे एका फुलविक्रेत्याने सांगितले.