व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली छेड काढणार्‍यांना शिवसेना देणार चोप

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तरुणी आणि शाळकरी मुलींची छेड काढणार्यांना शिवसेना चोप देणार असल्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला आहे.उद्या 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाच्या नावाखाली कुणी अश्लील चाळे करत असेल आणि शाळकरी मुलींची छेड काढत असेल त्यांना शिवसेनेच्या वतीने चोप देणार असल्याचे ते म्हणाले. शाळकरी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तरुणी आणि शाळकरी मुलींची छेड काढणार्‍यांना शिवसेना चोप देणार असल्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला आहे.
उद्या 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाच्या नावाखाली कुणी अश्‍लील चाळे करत असेल आणि शाळकरी मुलींची छेड काढत असेल त्यांना शिवसेनेच्या वतीने चोप देणार असल्याचे ते म्हणाले. शाळकरी मुली आणि तरुणींची कुणी छेड काढत असल्याचे दिसल्यास शिवसेना कार्यकर्त्यांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर काही संपर्क क्रमांकही दिले आहेत.