व्हॉट्‌स ॲपवर मेसेज केला, तू मला आवडते…नंतर थेट घरी पळवून नेण्यासाठी आला!!; जळगाव जामोद शहरातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः व्हॉट्स ॲपवर १६ वर्षीय मुलीला तू मला आवडते, असा मेसेज केल्यानंतर थेट तिला पळवून नेण्यासाठी घरी आलेल्या २२ वर्षीय तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ जुलैला जळगाव जामोद शहरात घडली. शहरातील अल्पवयीन मुलीच्या व्हाॅट्स अॅपवर चंद्रकांत ऊर्फ सोनू रघुवंशी याने “तू मला खूप आवडते. …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः व्हॉट्‌स ॲपवर १६ वर्षीय मुलीला तू मला आवडते, असा मेसेज केल्यानंतर थेट तिला पळवून नेण्यासाठी घरी आलेल्या २२ वर्षीय तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ जुलैला जळगाव जामोद शहरात घडली.

शहरातील अल्पवयीन मुलीच्या व्हाॅट्स अॅपवर चंद्रकांत ऊर्फ सोनू रघुवंशी याने “तू मला खूप आवडते. तू माझ्याशी लग्न कर, तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुला घरातून पळून नेईल’ असा मेसेज केला. तिने कोणताही रिप्लाय न केल्याने त्‍याने पुन्हा पुन्हा हा मेसेज केला. मात्र तरीही तिने कोणताही प्रतिसाद न दिल्याने संतापलेल्या चंद्रकांतने ८ जुलैला दुपारी दोनच्‍या सुमारास तिचे घर गाठले. घरात घुसून वाईट उद्देशाने तिचा हात पकडून माझ्यासोबत पळून चल, असे म्हणून विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरडा केली असता तो पळून गेला. मुलीचे वडील, भाऊ व मामाने त्‍याला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला पण तो हाती लागला नाही. पीडित मुलीने या प्रकरणाची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात केली. त्‍यावरून पोलिसांनी चंद्रकांत ऊर्फ सोनू रघुवंशीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सागर भास्कर करत आहेत.