व्‍यावसायिक शंकर वाधवानीने घरात दडवला होता लाखाचा गुटखा!; ‘एलसीबी’चा खामगावमध्ये छापा

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुटखा साठवून ठेवल्याप्रकरणी बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने खामगाव शहरातील सिंधी कॉलनीतील बड्या व्यावसायिकाच्या घरावर छापा मारला. तब्बल 1 लाख 4 हजार 950 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई काल, 22 मे रोजी सायंकाळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेला खामगाव शहरात अवैध गुटखा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गुटखा साठवून ठेवल्याप्रकरणी बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने खामगाव शहरातील सिंधी कॉलनीतील बड्या व्यावसायिकाच्‍या घरावर छापा मारला. तब्‍बल 1 लाख 4 हजार 950 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई काल, 22 मे रोजी सायंकाळी करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेला खामगाव शहरात अवैध गुटखा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल सायंकाळी खामगाव येथील तलाव रोडवरील सिंधी कॉलनी भागात शंकर वाधवानी यांच्या घरावर छापा मारण्यात आला. या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला. यामध्ये प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला, नजर गुटखा, तंबाखू ,पान बहार असा गुटखा मिळून आला. एकूण 1 लाख 4 हजार 950 रुपयांचा सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला.

यावेळी शंकर घनश्यामदास वाधवानी याच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधित पान मसाला गुटखा विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्‍या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पो.ना. गजानन आहेर, संजय नागवे यांनी केली.