शर्टच्‍या साह्याने शेतातील झाडाला युवकाने घेतला गळफास; बिबी येथील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शर्टच्या साह्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन 36 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना बिबी (ता. लोणार) शिवारात काल, 24 फेब्रुवारीला रात्री समोर आली.रवींद्र राधाकिसन मुर्तडकर (रा. बिबी) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो काल सकाळी शेतात जातो म्हणून घरातून निघाला होता. सायंकाळपर्यंतही परत न आल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शर्टच्‍या साह्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन 36 वर्षीय युवकाने आत्‍महत्‍या केली. ही घटना बिबी (ता. लोणार) शिवारात काल, 24 फेब्रुवारीला रात्री समोर आली.
रवींद्र राधाकिसन मुर्तडकर (रा. बिबी) असे या आत्‍महत्‍या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो काल सकाळी शेतात जातो म्‍हणून घरातून निघाला होता. सायंकाळपर्यंतही परत न आल्याने नातेवाइकांनी त्‍याचा शोध सुरू केला. शेतात झाडाला लटकलेला मृतदेह आढळला. बिबी पोलिसांनी घटनास्‍थळ गाठत पंचनामा करून अकस्‍मात मृत्‍यूची नोंद केली आहे. आत्‍महत्‍येचे कारण आजही समोर येऊ शकले नाही.