शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांनी घेतला पेपर वाचनाचा आनंद

प्रकृती उत्तम; पण होणार आणखी एक ऑपरेशन; अनेकांनी केली विचारपूसमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता.त्यांच्या पित्ताशयात मोठा खडा बाहेर काढण्यासाठी त्यांच्यावर एन्डोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करावी लागली आहे. पोटदुखीनंतर त्यांना बरे वाटत असुन पोटदुखीचा त्रासही पहिल्यापेक्षा कमी जाणवत असल्याचे त्यांच्यावर उपचारावर करणार्या …
 

प्रकृती उत्तम; पण होणार आणखी एक ऑपरेशन; अनेकांनी केली विचारपूस
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता.त्यांच्या पित्ताशयात मोठा खडा बाहेर काढण्यासाठी त्यांच्यावर एन्डोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करावी लागली आहे. पोटदुखीनंतर त्यांना बरे वाटत असुन पोटदुखीचा त्रासही पहिल्यापेक्षा कमी जाणवत असल्याचे त्यांच्यावर उपचारावर करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.पवारांनी सकाळी उठल्यानंतर प्रमुख वृत्तपत्रांचे वाचन करून राज्यातील घटनाघडामोडींचा आढावा घेतला. परिस्थिती समजून घेतली. पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पवारांसोबत आहेत. खा. सुप्रिया सुळेंनीच पवारांचा पेपर वाचतानाचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही पवारांच्या तब्येतीची चौकशी केली.शरद पवारांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी एक मोठा खडा अडकून बसला होता. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीच्या त्रासात वाढ झाली होती. पवारांची तब्येत बरी नसल्याचे समजल्यानंतर राज्यातील तसेच देशपातळीवरील अनेक नेत्यांनी पवारांच्या तब्येतीची चौकशी करून त्यांच्या तब्येतीला आराम पडून प्रार्थना केली. पवारांना रुग्णालयातून सुटी कधी मिळेल, हे अद्याप डॉक्टरांनी सांगितलेले नाही.तसेच आणखी काही दिवसांनी पवारांवर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.