शहीद जवान कैलास पवार म्‍हणाले होते, मेल्यावर स्मशानात जत्राच भरेल… अन्‌ झालेही तसेच!; इन्‍स्‍टाग्रामवरील ती पोस्‍ट उतरली सत्यात!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहीद जवान कैलास पवार यांच्यावर काल, ४ ऑगस्टला चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला एवढी अभूतपूर्ण आणि उत्स्फूर्त गर्दी यापूर्वी कधीच बघितली नसल्याची प्रतिक्रिया चिखलीकरांनी दिली. मिळेल त्या घरावर, गच्चीवर, झाडावर, रस्त्यावर उभे राहून लोक देशाच्या लाडक्या सुपूत्राचे दर्शन घेत होते. मैदानावर तर पाय …
 
शहीद जवान कैलास पवार म्‍हणाले होते, मेल्यावर स्मशानात जत्राच भरेल… अन्‌ झालेही तसेच!; इन्‍स्‍टाग्रामवरील ती पोस्‍ट उतरली सत्यात!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहीद जवान कैलास पवार यांच्यावर काल, ४ ऑगस्‍टला चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्‍काराला एवढी अभूतपूर्ण आणि उत्‍स्फूर्त गर्दी यापूर्वी कधीच बघितली नसल्याची प्रतिक्रिया चिखलीकरांनी दिली. मिळेल त्या घरावर, गच्चीवर, झाडावर, रस्त्यावर उभे राहून लोक देशाच्या लाडक्या सुपूत्राचे दर्शन घेत होते. मैदानावर तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. लोकांना शांत करण्यासाठी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक व्हीआयपी पेंडॉलमधील खुर्ची सोडून बॅरिकेट्सजवळ नियंत्रण ठेवुन होते. मैदानावरील व शहरातील हे भावविभोर दृश्य पाहून शहीद जवान कैलास पवार यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्‍टाग्रामवर लिहिलेली पोस्ट सत्यात उतरल्याचे दिसून आले. “कमी वयात एवढे मित्र कमावलेत की मेल्यावर स्मशानात जत्राच भरेल’, अशी पोस्ट कैलास पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्‍यावर काही दिवसांपूर्वी लिहिली होती. काल जत्रा नव्हे तर एखाद्या महायात्रेपेक्षाही अधिक गर्दी चिखली शहरात झाली होती. या गर्दीमुळेच सकाळी १० वाजता नियोजित असलेला अंत्यविधी तब्बल पावणेचार तास उशिराने झाला. मृत्यूचाही सोहळा होणे म्हणजे काय असते, याचा अनुभव चिखलीकरांनी घेतला.

हीच ती पोस्‍ट..

शहीद जवान कैलास पवार म्‍हणाले होते, मेल्यावर स्मशानात जत्राच भरेल… अन्‌ झालेही तसेच!; इन्‍स्‍टाग्रामवरील ती पोस्‍ट उतरली सत्यात!!