शहीद जवान सतीश पेहरे यांच्‍या कुटुंबियांना शासनाकडून 1 कोटीची मदत

लडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अमोना (ता. चिखली) येथील शहीद जवान सतीश सुरेश पेहरे हे पूर्व लडाख गलवान घाटी, जम्मू काश्मिर येथे 14 जुलै 2020 रोजी शहीद झाले. त्यांच्या कुटूंबियांना राज्य शासनातर्फे 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर होऊन मदतीचा धनादेश आज, 19 मार्चला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे …
 

लडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अमोना (ता. चिखली) येथील शहीद जवान सतीश सुरेश पेहरे हे पूर्व लडाख गलवान घाटी, जम्मू काश्मिर येथे 14 जुलै 2020 रोजी शहीद झाले. त्‍यांच्‍या  कुटूंबियांना राज्य शासनातर्फे 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर होऊन मदतीचा धनादेश आज, 19 मार्चला राज्याचे अन्‍न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान सतिष पेहरे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रुपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती जया सतिष पेहरे, वीरमाता श्रीमती अलका सुरेश पेहरे यांना 20 लक्ष रुपये, वरपिता सुरेश छोटीराम पेहरे यांना 20 लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला.