शाळा फोडून एलईडी टीव्‍हीसह 18 हजारांचा माल लंपास; बोथा काजी येथील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह) ः शाळा फोडून चोरट्यांनी एलईडी टीव्हीसह 18 हजार 800 रुपयांचे शैक्षणिक साहित्य लंपास केले. ही घटना बोथाकाजी (ता. खामगाव) येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत 1 मार्चच्या सकाळी समोर आली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मुख्याध्यापक मो तलहा अ वहान …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह) ः शाळा फोडून चोरट्यांनी एलईडी टीव्‍हीसह 18 हजार 800 रुपयांचे शैक्षणिक साहित्‍य लंपास केले. ही घटना बोथाकाजी (ता. खामगाव) येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत 1 मार्चच्‍या सकाळी समोर आली. शाळेच्‍या मुख्याध्यापकांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
मुख्याध्यापक मो तलहा अ वहान शेख हे सहकारी शिक्षकांसोबत सकाळी शाळेत आले असता शाळेच्या नवीन खोलीच्या वरच्या मजल्यावर त्यांना लोखंडी गेट तुटलेले दिसले. वरच्या खोलीचे कुलूपही तुटलेले दिसले. वर्गात जाऊन पाहिले असता 1 सॅमसंग कंपनीचा 32 इंच एलईडी टीव्ही व 1 लाकडी बॅट, 19 लेझीम 6 क्रिकेट स्टंप असे एकूण 18 हजार 800 रुपयांचे शैक्षणिक साहित्‍य चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळले. तपास  ठाणेदार रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दीपक इलामे करीत आहेत.