शासकीय भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात १४ केंद्र!; ३० सप्‍टेंबरपर्यंत करा नोंदणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या भरडधान्याची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मार्केटींग फेडरेशनचे सब …
 
शासकीय भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात १४ केंद्र!; ३० सप्‍टेंबरपर्यंत करा नोंदणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या भरडधान्याची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मार्केटींग फेडरेशनचे सब एजंट संस्थामार्फत ऑनलाईन शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे.

जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, संग्रामपूर व शेगाव, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खुर्द केंद्र साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा, माँ जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिंदखेड राजा, नांदुरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा केंद्र वाडी ता. नांदुरा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, चालू असलेला सात बारा, पिकपेरासह संपूर्ण कागदपत्रे संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.