शासकीय हरभरा खरेदी सुरू; 5100 प्रति क्‍विंटल हमी भाव

जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यताबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात चालू हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5100 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी करणे सुरू झाले आहे. हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. बुलडाणा येथे तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, देऊळगावराजा येथे …
 

जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
जिल्ह्यात चालू हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5100 रुपये प्रती क्‍विंटल प्रमाणे खरेदी करणे सुरू झाले आहे. हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

बुलडाणा येथे तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, देऊळगावराजा येथे तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, लोणार येथे तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, मेहकर येथे तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, शेगाव येथे तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, संग्रामपूर येथे तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्यूसर कंपनी सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता. चिखली अशा 10 खरेदी केंद्रांना हरभरा खरेदी करीता मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात हरभरा खरेदी करण्याकरिता हेक्टरी उत्पादकता 15.82 क्‍विंटल देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हमीभावाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यासाठी या संस्थांकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.