शिक्षकाने घरातच घेतला गळफास, मृत्यूपूर्व चिठ्ठीत म्हणाले…

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 26 जानेवारीला रात्री आठच्या सुमारास मलकापूर शहरातील पंचमुखीनगरात घडली. प्रवीण रामदास निंबोळे (45) असे या शिक्षकाचे नाव असून, ते यशोधाम पब्लिक स्कूलमध्ये शिकवत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटलेले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 26 जानेवारीला रात्री आठच्या सुमारास मलकापूर शहरातील पंचमुखीनगरात घडली. प्रवीण रामदास निंबोळे (45) असे या शिक्षकाचे नाव असून, ते यशोधाम पब्लिक स्कूलमध्ये शिकवत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटलेले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोकाँ संजय वेरूळकार करत आहेत.