शिक्षकाविरुद्ध शिक्षिकेने केली विनयभंगाची तक्रार; तिच्‍या पतीसह चौघांविरुद्ध मारहाणीचा शिक्षकाचा आरोप, नांदुरा येथील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधीच्या ओळखीतून सतत त्रास देत, शिक्षकाने घरी येऊन विनयभंग केल्याची तक्रार शिक्षिकेने नांदुरा पोलिसांत केली. त्यावरून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. या प्रकरणात शिक्षकाला मारहाण केल्यावरून पोलिसांनी शिक्षिकेच्या पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदुरा खुर्द येथे हा प्रकार घडला आहे. नितीन मधुकर चिंचपुरे (31, रा. वाघुळ, ता. मलकापूर) असे …
 
शिक्षकाविरुद्ध शिक्षिकेने केली विनयभंगाची तक्रार; तिच्‍या पतीसह चौघांविरुद्ध मारहाणीचा शिक्षकाचा आरोप, नांदुरा येथील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आधीच्‍या ओळखीतून सतत त्रास देत, शिक्षकाने घरी येऊन विनयभंग केल्याची तक्रार शिक्षिकेने नांदुरा पोलिसांत केली. त्‍यावरून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. या प्रकरणात शिक्षकाला मारहाण केल्यावरून पोलिसांनी शिक्षिकेच्‍या पतीसह चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. नांदुरा खुर्द येथे हा प्रकार घडला आहे.

नितीन मधुकर चिंचपुरे (31, रा. वाघुळ, ता. मलकापूर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो दहिगाव येथील श्री गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालयात आठ वर्षांपासून शिक्षक आहे. नांदुरा येथील काळे यांच्‍या अकॅडमीत 3 वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेत असताना त्‍याची ओळख तिथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येणाऱ्या पीडितेशी झाली. तेव्हापासून ओळख आहे. त्‍यानंतर 2 वर्षांपासून सारीका डागा यांच्‍याकडे लेखनीक म्हणून काम नितीन चिंचपुरे काम करतो. त्‍यावेळी पीडिता डागा यांच्‍याकडे सचिव म्‍हणून काम करत होती. त्‍यावेळी दोघांत मैत्री होऊन फोनवर अधून – मधून बोलत होतो, असे नितीनने दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीत म्‍हटले आहे.

12 जूनला सारीका डागा यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी त्‍याला फोन करून जितू मोरेच्‍या घरी वाढदिवसासाठी बोलावले. त्‍यावेळी पीडितेला नितीनने डागा यांच्‍यासाठी साडी घेण्यास सूचवले. 16 जूनला सकाळी 10 वाजता नितीन हा पीडिता ज्‍या खासगी शाळेवर सहायक शिक्षिका आहे तिथे साडीचे पैसे देण्यासाठी गेला होता. मात्र पीडितेने शुभांगी झांबरे हिला पैसे द्या. मी तिच्‍याकडून पैसे घेतले होते,असे म्हटल्यामुळे तो तेथून निघून आला, असे नितीनने तक्रारीत म्‍हटले आहे. मात्र यात पीडितेच्‍या पतीला गैरसमज झाल्याने तो त्‍याला समजावण्यासाठी त्‍याच्‍या घरी गेला असता त्‍याने शिविगाळ करून लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. त्‍याचा मित्र जितू मोरे यानेही शिविगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्‍यानंतर दोघांनी त्‍याला पोलीस स्टेशनमध्ये नेतो असे सांगून सारीका डागा यांच्‍या घरी नेले. तिथेही सारीका डागा, शुभांगी रामभाऊ झांबरे, प्रकाश लक्ष्मण बावस्कार, जीतु मोरे यांनी मारहाण केली, असे नितीनने तक्रारीत म्‍हटले आहे. यावेळी त्‍याचा मोबाइल हिसकावून मोबाइलही चेक करण्यात आला. नितीनच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी सारिका, शुभांगी, प्रकाश, जितू मोरे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
या तक्रारीनंतर पीडितेनेही तक्रार दिली. नितीन ओळखीमुळे तिला मेसेज करून त्रास देत होता. शाळेवर त्‍याला बोलण्यास नकार दिल्याने तो घरी गेला आणि तिच्‍या पतीला शिविगाळ केली. यावेळी शिक्षिका घरी आली असता नितीनने वाईट उद्देशाने तिला हात धरून विनयभंग केला, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून नितीनला अटक केली. तपास पोलीस उपनिरिक्षक किशोर घोडेस्‍वार करत आहेत.