शिजविलेले चिकन, उकळलेली अंडी खाऊन अधिकारी म्हणाले, बर्ड फ्लूला तुम्हीही घाबरू नका!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पक्ष्यांवर घोंघावत असलेल्या बर्ड फ्लूच्या संकटाला न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासन नियमितरित्या करत आहे. जिल्ह्यात सध्या तरी कुठलाही पक्षी बर्ड फ्लूने बाधित नाही. या रोगापासून घाबरून जाण्याची गरज नाही. पूर्ण शिजविलेले चिकन व उकळलेली अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होत नाही. हा संदेश देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे आज, 15 जानेवारी रोजी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पक्ष्यांवर घोंघावत असलेल्या बर्ड फ्लूच्या संकटाला न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासन नियमितरित्या करत आहे. जिल्ह्यात सध्या तरी कुठलाही पक्षी बर्ड फ्लूने बाधित नाही. या रोगापासून घाबरून जाण्याची गरज नाही. पूर्ण शिजविलेले चिकन व उकळलेली अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होत नाही. हा संदेश देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे आज, 15 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिजविलेले व तयार केलेले चिकन, उकळलेली अंडी खावून प्रात्याक्षिक करण्यात आले.

या वेळी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी बोरकर, नायब तहसीलदार श्री. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सोळंके आदींनी शिजविलेले चिकन व अंडी खाऊन बर्ड फ्लूला न घाबरण्याचे आवाहन केले. जनतेने न घाबरता काळजी घेत पूर्ण शिजविलेले चिकन व उकळलेले अंडी खावी. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. या प्रात्याक्षिकातून पशुसंवर्धन विभागाने जनतेला संदेश न घाबरता सावधगिरी बाळण्याचा संदेश दिला. डॉ. बोरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. पाटील, डॉ. चोपडे, डॉ. धिरज सोनटक्के, पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद डॉ. दिवाकर काळे, बायएफ व पोल्ट्री फॉर्मचे डॉ. रवींद्र उगले, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैशाली उईके, डॉ. ज्योती गवई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.