शिवजयंतीच्या बैठकीत विजेचा धक्का लागून सरपंचाचा मृत्यू, मंगरूळ येथील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवजयंतीची तयारीच्या बैठकीत विजेचा धक्का लागून मंगरूळ डोलखेडा गावचे सरपंच दगडूबा बोरुडे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल, 11 फेब्रुवारीला रात्री 9:30 वाजता घडली.बुलडाणा- जालना सीमेवर शेळगाव आटोळजवळील मंगरूळ डोलखेडा (ता. जाफराबाद) येथे शिवजयंतीच्या नियोजन बैठकीसाठी गावातील कार्यकर्ते जमले होते. त्याचवेळी मंदिरात माईक लावण्यासाठी गेलेल्या सरपंच …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवजयंतीची तयारीच्या बैठकीत विजेचा धक्का लागून मंगरूळ डोलखेडा गावचे सरपंच दगडूबा बोरुडे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल, 11 फेब्रुवारीला रात्री 9:30 वाजता घडली.
बुलडाणा- जालना सीमेवर शेळगाव आटोळजवळील मंगरूळ डोलखेडा (ता. जाफराबाद) येथे शिवजयंतीच्या नियोजन बैठकीसाठी गावातील कार्यकर्ते जमले होते. त्याचवेळी मंदिरात माईक लावण्यासाठी गेलेल्या सरपंच बोरूडे यांना विजेचा धक्का लागला. बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने कार्यकर्त्यांनी आत जाऊन बघितले असता बोरूडे मृतावस्थेत पडलेले दिसून आले. जालना जिल्ह्यातील रहिवासी बोरुडे यांचा बुलडाणा जिल्ह्यातही मोठा मित्रपरिवार होता.