शिवशंकरभाऊ मानलं तुम्‍हाला!.. बेवारस बॅगमध्ये आढळले ८,00,000 रुपये!!; एसटी मेकॅनिकने पोलीस ठाण्यात आणून दिले, बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी महामंडळात मॅकेनिक असलेले शिवशंकर नामदेव आदे हे खरेदीसाठी बुलडाण्यातील आठवडे बाजारात गेले होते. परतताना त्यांना रस्त्यात एक बॅग सापडली. बॅगेत चक्क आठ लाख रुपये होते. त्यांनी लगेच ती बॅग शहर पोलीस ठाण्यात आणून दिली. आजही समाजात प्रामाणिकपणा जीवंत असल्याचा प्रत्यय या घटनेतून सर्वांना आला आहे. या आठ लाख रुपयांत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी महामंडळात मॅकेनिक असलेले शिवशंकर नामदेव आदे हे खरेदीसाठी बुलडाण्यातील आठवडे बाजारात गेले होते. परतताना त्यांना रस्त्यात एक बॅग सापडली. बॅगेत चक्‍क आठ लाख रुपये होते. त्यांनी लगेच ती बॅग शहर पोलीस ठाण्यात आणून दिली. आजही समाजात प्रामाणिकपणा जीवंत असल्याचा प्रत्‍यय या घटनेतून सर्वांना आला आहे. या आठ लाख रुपयांत काय होऊ शकत नव्हते? पण जे आपले नाही ते ठेवून करायचे काय, हा धडाच श्री. आदे यांनी वर्तनातून दिला आहे. काल, २६ जुलैला ही घटना घडली. हे आठ लाख रुपये देऊळघाट येथील जिल्हा परिषद शिक्षक असलम खान अमनुल्ला खान यांचे असल्याचे समोर आले आहे. त्यांनी त्यांचा प्लॉट विकून खरेदी करणाऱ्याकडून आठ लाख रुपये घेतले होते. असलम खान हे धाडच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षक आहेत. आज, २७ जुलै रोजी दुपारपर्यंत पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू होती.