शिवसेना नेत्‍याचा असाही आदर्श… शेतात खड्डा खोदून वडिलांचे रक्षाविसर्जन, त्‍यात लावले पिंपळाचे झाड!, तेरवीच्‍या कार्यक्रमाऐवजी तुम्‍हीच वाचा काय घेतलाय निर्णय!

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील शिवसेना नेते डॉ. रामप्रसाद शेळके यांचे वडील तसेच श्रीक्षेत्र वैष्णवगडचे अध्यक्ष, सिनगाव जहा.चे माजी सरपंच रंगनाथराव पाटील शेळके यांचे 3 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम 5 एप्रिल रोजी पार पडला. त्यांचे पूत्र शिवसेना नेते डॉ. रामप्रसाद शेळके यांनी समाजासमोर आदर्श ठेवत वडिलांच्या रक्षा विसर्जन व …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील शिवसेना नेते डॉ. रामप्रसाद शेळके यांचे वडील तसेच श्रीक्षेत्र वैष्णवगडचे अध्यक्ष, सिनगाव जहा.चे माजी सरपंच रंगनाथराव पाटील शेळके यांचे 3 एप्रिल  रोजी निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम 5 एप्रिल रोजी पार पडला. त्‍यांचे पूत्र शिवसेना नेते डॉ. रामप्रसाद शेळके यांनी समाजासमोर आदर्श ठेवत वडिलांच्या रक्षा विसर्जन व अस्थी नदी न सोडता शेतातच खड्डा खोदून त्‍यात सोडल्या व त्‍यात पिंपळाचे रोप लावले.

रंगनाथ पाटील शेळके यांचा जन्म हा सधन शेतकरी कुटूंबात झाला होता. त्यांना लहानपणापासून शेतीची आवड होती. समाजकारण व राजकारणात स्व. भास्कराव श़िगणे यांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांतील पदे त्यांनी भूषवली आहेत. आपल्या वडिलांच्‍या विचारांचा व संस्काराचा वारसा शिवसेना नेते व फुले ,शाहू, आंबेडकर, आझाद विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांनी समर्थपणे संभाळला आहेत.  वडिलांच्‍या आठवणी त्‍यांनी अनोख्या पद्धतीने जपण्याचा निर्णय घेतला. पिंपळाचे झाड लावण्याबरोबरच तेरवीचा कार्यक्रम न करता एक लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यावरील व्याजातून तालूक्यातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थीना प्रोत्साहनपर बक्षीस ते देणार आहेत.