शिवसेनेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, चिखली, देऊळगाव राजातून अन्नधान्य, किराणा साहित्य रवाना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिवृष्टीग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांसाठी चिखलीतून मदत पाठविण्यात आली. १०१ क्विंटल गव्हाचे पोते व किराणा साहित्य एसटी बसमधून रवाना झाले. यासाठी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, शिवसेना नेते भास्करराव मोरे, उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिवृष्टीग्रस्‍त कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांसाठी चिखलीतून मदत पाठविण्यात आली. १०१ क्विंटल गव्हाचे पोते व किराणा साहित्‍य एसटी बसमधून रवाना झाले. यासाठी शिवसेना व युवा सेनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, शिवसेना नेते भास्करराव मोरे, उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, युवा सेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहर संघटक प्रीतम गैची, वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय हाडे, युवा सेना शहरप्रमुख विलास घोलप, युवासेना शहर समन्वय आनंद गैची, शिवसेना उपतालुका प्रमुख किसनराव धोंडगे, विलास सुरडकर, लालसिंग मोरे, विश्वास खंडागळे, उपशहरप्रमुख मनोज वाघमारे, उपशहर प्रमुख समाधान जाधव, उपशहरप्रमुख दत्ता देशमुख, उपशहरप्रमुख रवीआप्पा पेटकर, बाजार समितीचे संचालक गजानन पवार, प्रसिद्धी प्रमुख बंटी कपूर, विभाग प्रमुख सुनील रगड, युवा सेना विभाग प्रमुख प्रवीण सरदड, प्रल्हाद वाघ, बंटी लोखंडे, पप्पू परिहार, राम मालोदे, प्रकाश ठेंग, मंगेश ठेंग, अरुण सुरडकर अादी उपस्‍थित होते.

देऊळगाव राजातूनही मदत
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वात तालुका शिवसेनेतर्फे आज, २९ जुलैला सकाळी एसटीच्‍या मालवाहक बसने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत म्हणून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या. यावेळी जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर, तालुकाध्यक्ष दादाराव खारडे, श्री. शिंपणे, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, विजू उपाध्ये, उपनगराध्यक्ष पवन झोरे, नगरसेवक नंदन खेडेकर, जगदीश कापसे, हाजी शौकत, हाजी शाह सेठ, गिरीश वाघमारे, अभय दीडहाते, अतिश खरात, विवेक खेडेकर आदी उपस्‍थित होते.