शुकदास महाराजांना मरणोपरांत पद्मविभूषण प्रदान करावा ः प्रा. जोगेंद्र कवाडे यांची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प. पू. शुकदास महाराजांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून सरकारने त्यांना मरणोपरांत पद्मविभूषण प्रदान करावा, अशी मागणी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. श्री. कवाडे यांनी हिवरा आश्रम (ता. बुलडाणा) येथे भेट दिल्यानंतर विवेकानंद आश्रमाची पाहणी केली. संत शुकदास महाराजांनी अश्रक परिश्रमातून हिवरा आश्रम गावाला राज्यात व देशात नावलौकिक प्राप्त करून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प. पू. शुकदास महाराजांच्‍या अलौकिक कार्याचा गौरव म्‍हणून सरकारने त्‍यांना मरणोपरांत पद्मविभूषण प्रदान करावा, अशी मागणी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

श्री. कवाडे यांनी हिवरा आश्रम (ता. बुलडाणा) येथे भेट दिल्यानंतर विवेकानंद आश्रमाची पाहणी केली. संत शुकदास महाराजांनी अश्रक परिश्रमातून हिवरा आश्रम गावाला राज्‍यात व देशात नावलौकिक प्राप्‍त करून दिला. केवळ आध्यात्‍मिकच नव्हे तर विविध विद्याशाखांद्वारे शैक्षणिक क्रांती घडविण्याचे राष्ट्रकार्य केले. महाराजांच्‍या कल्‍पनेतील आध्यात्मिक तीर्थ आणि सोबतच सुंदर असे पर्यटन स्‍थळ त्‍यांची स्‍मृती देत राहील, असेही श्री. कवाड म्‍हणाले.