शेगावचे जमादार पंकज गिते भारतीय दूतावासात नियुक्‍त

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले पंकज गीते यांची विदेश मंत्रालयाकडून भारतीय दुतावासासाठी निवड करण्यात आली आहे. ही माहिती कळताच त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय विदेश मंत्रालयाकडून विविध देशांत असलेल्या भारतीय दूतावासाच्या सुरक्षा विभागातील विविध पदांसाठी भारताच्या विविध प्रांतामधून पोलीस …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले पंकज गीते यांची विदेश मंत्रालयाकडून भारतीय दुतावासासाठी निवड करण्यात आली आहे. ही माहिती कळताच त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारतीय विदेश मंत्रालयाकडून विविध देशांत असलेल्या भारतीय दूतावासाच्‍या सुरक्षा विभागातील विविध पदांसाठी भारताच्या विविध प्रांतामधून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्या त्या राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत अर्ज मागविण्यात येतात. अतिशय कठीण आणि प्रतिष्ठित समजली जाणारी ही निवड प्रक्रिया 2019 मध्ये घेण्यात आली होती.

लॉकडाऊनमुळे त्याचा निकाल 12 जून 2019 रोजी कळविण्यात आला. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ चार कर्मचारी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. पैकी दोन कर्मचारी हे अमरावती विभागातील असून, यात पंकज गीते यांची सिक्युरिटी असिस्टंट या पदावर भारतीय दूतावासात नियुक्‍ती झाली आहे. सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी ते 12 जून रोजी शेगाव येथून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. शेगाव येथील पोलीस दलाची या नियुक्‍तीमुळे मान उंचावली आहे.