आणखी एका इंजिनिअर पतीचा कारनामा… बायकोला दिली ही धक्कादायक धमकी!; शेगावच्या विवाहितेची पोलिसांत तक्रार

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४१ वर्षीय विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेला पती इंजिनिअर असून, सासरा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे. तू जर पोलिसांत तक्रार केली तर तुझ्या बहिणीच्या मुलीची व भावाच्या मुलीची इज्जत लुटू, अशी धमकी या विवाहितेला देण्यात आली होती. सौ. वैशाली …
 
आणखी एका इंजिनिअर पतीचा कारनामा… बायकोला दिली ही धक्कादायक धमकी!; शेगावच्या विवाहितेची पोलिसांत तक्रार

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४१ वर्षीय विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. गुन्‍हा दाखल झालेला पती इंजिनिअर असून, सासरा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे. तू जर पोलिसांत तक्रार केली तर तुझ्या बहिणीच्या मुलीची व भावाच्या मुलीची इज्जत लुटू, अशी धमकी या विवाहितेला देण्यात आली होती.

सौ. वैशाली प्रवीण देशमुख (४१, रा. शेगाव) या विवाहितेने काल, ३० सप्टेंबर तक्रार दिली, की त्‍यांचे लग्न अमरावती येथील इंजिनिअर प्रवीण देशमुख याच्यासोबत २०१५ मध्ये झाले. लग्नानंतर केवळ १५ दिवस तिला सासरच्यांनी चांगले वागवले. नंतर सेवानिवृत्त पीएसआय असलेल्या तिच्या सासऱ्याने, सासूने व नवऱ्याने तिच्या अंगावरील सर्व दागिने काढून स्वतःजवळ ठेवले. घरात तिला हीन वागणूक दिली जात होती. वैशालीला मुलगी झाल्यानंतर सासरच्यांचा त्रास आणखी वाढला. सासरी तुरुंगासारखे वातावरण होते. ती फोनवर बोलत असताना कॉल रेकॉर्ड करावा लागत होता, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. सासरचे लोक अंधविश्वासू होते. त्यांचा एका बाबावर विश्वास होता. वैशालीला सुद्धा ते बाबाकडे घेऊन जात होते व बाबांचे नियम बळजबरी पाळायला लावत होते.

संपूर्ण कुटूंबाच्या खर्चाची जबाबदारी वैशालीने उचलावी म्‍हणून माहेरावरून ५ लाख रुपये आण, अशी मागणी सासरच्यांनी तिच्याकडे केली. मात्र लग्नातच अधिक खर्च झाल्याने तिचे आई- वडील ही मागणी पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे वैशालीला लग्नानंतर दोनच वर्षांत माहेरी हाकलून लावले. तू जर पोलिसांत तक्रार केली तर तुझ्या बहिणीच्या मुलीची व भावाच्या मुलीची इज्जत लुटू, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मध्यस्थांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही सासरच्यांनी नांदवायला नकार दिल्याने तिने काल शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पती प्रवीण अरुणराव देशमुख (४३), सासरा अरुणराव भास्करराव देशमुख (६८), दीर आशिष अरुणराव देशमुख, जाऊ प्रियांका आशिष देशमुख (३९, सर्व रा. ३०१, अंबर टाॅवर, जोगळेकर प्लॉट रुक्मिणीनगर अमरावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.