शेगावच्या सामान्य रुग्णालयात अद्ययावत सिटीस्कॅन यंत्र उपलब्ध

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात अद्ययावत सिटीस्कॅन यंत्र उपलब्ध झाले आहे. त्याचे लोकार्पण जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते पार पडले. सर्वसामान्यांना आधार देऊन मोफत दरात उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे यावेळी डॉ. कुटे म्हणाले.सोहळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात अद्ययावत सिटीस्कॅन यंत्र उपलब्ध झाले आहे. त्याचे लोकार्पण जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते पार पडले.

सर्वसामान्यांना आधार देऊन मोफत दरात उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे यावेळी डॉ. कुटे म्हणाले.
सोहळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांच्यासह शेगाव शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष शकुंतलाताई बुच, उपनगराध्यक्ष सौ. कलोरे, डॉ. ज्योती भुतडा, आरोग्य सभापती मंगलाताई चव्हाण, ज्योतीताई चांडक, नगरपरिषदेचे गटनेते शरद अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे शेगाव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, राजेश अग्रवाल, सुधाकर चव्हाण, दीपक ढमाळ, प्रमोद काठोळे, प्रदीप सांगळे, मुकिंदा खेळकर, गणगणे, किरण देशमुख, सचिन ढमाळ,  पुरुषोत्तम हाडोळे, अशोक चांडक, महादेव पोटदुखे, संजय कलोरे, गजानन जवंजाळ, पवन महाराज शर्मा, डॉक्टर मोहन बानोले, पांडुरंग बुच, राजू भिसे, शंकर माळी आदींची उपस्थिती होती.