शेगावमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या युवकासह तीन महिला ताब्‍यात

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव-खामगाव रोडवरील जमजमनगर समोरील लेआऊट परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या तीन महिलांसह एका युवकाला शेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना काल, 11 जूनच्या दुपारी घडली.विघ्नहर्ता लॉजच्या मागे महिला व पुरुष अश्लील चाळे करत असल्याची माहिती शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष टाले यांना मिळाली होती. त्यावरून श्री. टाले यांनी …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव-खामगाव रोडवरील जमजमनगर समोरील लेआऊट परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या तीन महिलांसह एका युवकाला शेगाव शहर पोलिसांनी ताब्‍यात घेतल्याची घटना काल, 11 जूनच्‍या दुपारी घडली.
विघ्नहर्ता लॉजच्‍या मागे महिला व पुरुष अश्लील चाळे करत असल्याची माहिती शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष टाले यांना मिळाली होती. त्‍यावरून श्री. टाले यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह त्‍या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी महिला व पुरुष अश्लील चाळे करताना मिळून आले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी शुभम नावाच्‍या युवकासह तीन महिलांना ताब्‍यात घेतले.