शेगावमध्ये खानावळ चालवणाऱ्या प्रेयसीवर लैंगिक अत्‍याचार!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खानावळ चालवणाऱ्या ४५ वर्षीय प्रेयसीवर ५० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना शेगाव शहरातील लाल बाबादेवी परिसरात १५ जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. त्यानंतर पीडिता उपचारासाठी दवाखान्यात भरती असल्याने १९ जूनला रात्री तिने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. रवींद्र भालेराव (रा. लाल बाबादेवी समोर, …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खानावळ चालवणाऱ्या ४५ वर्षीय प्रेयसीवर ५० वर्षीय व्‍यक्‍तीने लैंगिक अत्‍याचार केला. ही घटना शेगाव शहरातील लाल बाबादेवी परिसरात १५ जूनला रात्री साडेअकराच्‍या सुमारास घडली. त्यानंतर पीडिता उपचारासाठी दवाखान्यात भरती असल्याने १९ जूनला रात्री तिने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. रवींद्र भालेराव (रा. लाल बाबादेवी समोर, शेगाव) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र भालेराव मूळचा नाशिकचा असून, शेगाव येथे एका कंपनीत काम करतो. त्‍याने पीडितेकडे जेवणाचा डब्बा लावला होता. या ओळखीतून दोघांत गेल्या ६ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. १५ जून रोजी रात्री साडेअकराला तो डब्बा आणायला गेला असता त्याने शरीरसुखाची मागणी केली. नकार मिळाल्यावर त्याने जबरदस्ती करायला सुरुवात केली. तिने विरोध केला असता तिच्या तोंडावर दगड मारून त्‍याने मारहाण केली व खाली पाडून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

घडला प्रकार कुणाला सांगितल्यास दोरीने गळा दाबून मारून टाकेन, अशी धमकी दिली. यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली होती. शुद्धीवर आल्यावर उपचारासाठी दवाखान्यात भरती असल्याने तिने १९ जूनला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक श्रीमती गोसावी करत आहेत.शेगावमध्ये खानावळ चालवणाऱ्या प्रेयसीवर लैंगिक अत्‍याचार!