शेगावमध्ये घरफोडी; ५४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दोन मोबाइल असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना शेगाव शहरातील गौलखेड रोडवरील आयोध्यानगरात काल, ३० जुलैला सकाळी दहाच्या सुमारास घडली. माधवसिंह काशीराम डाबेराव (३५) यांनी या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरटे दरवाजाचे …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्‍कम व दोन मोबाइल असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना शेगाव शहरातील गौलखेड रोडवरील आयोध्यानगरात काल, ३० जुलैला सकाळी दहाच्‍या सुमारास घडली.

माधवसिंह काशीराम डाबेराव (३५) यांनी या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरटे दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरले. लॉकर तोडून नगदी २४ हजार रुपये तसेच ॲपल कंपनीचे दोन मोबाइल किंमत अंदाजे तीस हजार रुपये असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रीकृष्ण डांगे करीत आहेत. दोनच दिवसांपूर्वी आठवडे बाजार परिसरातील वैष्णवी प्रोव्हिजनमध्ये चोरी होऊन चोरट्यांनी ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. शहरात वाढलेल्या चोऱ्यांमुळे शहरवासियांत चिंतेचे वातावरण आहे. पोलिसंनी चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.