शेगावमध्ये जुगार अड्ड्यावरील छाप्यात अडकले 10 बडे मासे!; भाजपा पदाधिकाऱ्याचाही समावेश, 4 लाखांचा मुद्देमाल जप्‍त

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाळापूर रोडवरील वनविहार ढाब्यामागील जंगलात रंगलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शेगाव शहर पोलिसांनी छापा मारून 10 बडे मासे गळाला लावले. यात एका भाजपा पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. बहुतांश आरोपी प्लॉटिंग व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून तब्बल 4 लाख 14 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज, 23 मे …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बाळापूर रोडवरील वनविहार ढाब्‍यामागील जंगलात रंगलेल्या जुगाराच्‍या अड्ड्यावर शेगाव शहर पोलिसांनी छापा मारून 10 बडे मासे गळाला लावले. यात एका भाजपा पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. बहुतांश आरोपी प्‍लॉटिंग व्‍यवसायाशी संबंधित आहेत. त्‍यांच्‍याकडून तब्‍बल 4 लाख 14 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई आज, 23 मे रोजी करण्यात आली.

सूत्रांनी सांगितले, की गोपनीय माहितीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे व सहायक फौजदार लक्ष्मण मिरगे, पो.ना. गणेश वाकेकर, पो.ना. उमेश बोरसे, पो.काँ. विजय साळवे, पो.काँ. प्रकाश गव्‍हांदे, पो.काँ. हरिचंद्र बारवाल यांच्‍या पथकाने ठाणेदार श्री. ताले यांच्‍या नेतृत्त्वात हा छापा मारला. भाजपाचा पदाधिकारी असलेला समीर जगन्‍नाथ मोरे (44, रा. साईनगर, शेगाव), अनंता प्रल्हाद चव्हाण (45, रा. रोकडियानगर, शेगाव), विष्णू समाधान निळे (37, रा. सिरजगाव निळे, ता. शेगाव), श्रीकृष्ण महादेव चारोळे (43, रा. ताडी, शेगाव), श्याम तुळशीराम नेमाडे (45, रा. डोंगरगाव, ता. बाळापूर, जि. अकोला), शिवशंकर शेषराव शेजोळे (45, रा. येऊलखेड, ता. शेगाव), महेंद्र वासुदेव अग्रवाल (35, रा. एसबीआय कॉलनी, शेगाव), अनिल साहेबराव वक्‍ते (36, रा. रोकडियानगर, शेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्‍यांच्‍याकडून 6 मोबाइल, 7 मोटारसायकली, जुगार साहित्‍य असा एकूण 4 लाख 14 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सर्व आरोपींविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.