शेगावमध्ये पोलिसाचे घर फोडले!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घर फोडले. लोखंडी सळईने कुलूप तोडून कपाटातील चीजवस्तू गायब केल्या. ही घटना आज, १४ ऑगस्टला सकाळी सहाच्या सुमारास समोर आली. चोरीस नक्की काय काय गेले, हे मुलगा आणि सून घरी आल्यानंतर कळेल, त्यानंतर पोलिसांत तक्रार करू, असे घरमालक असलेले पोहेकाँ …
 
शेगावमध्ये पोलिसाचे घर फोडले!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घर फोडले. लोखंडी सळईने कुलूप तोडून कपाटातील चीजवस्तू गायब केल्या. ही घटना आज, १४ ऑगस्‍टला सकाळी सहाच्‍या सुमारास समोर आली. चोरीस नक्‍की काय काय गेले, हे मुलगा आणि सून घरी आल्यानंतर कळेल, त्‍यानंतर पोलिसांत तक्रार करू, असे घरमालक असलेले पोहेकाँ अंबादास चव्‍हाण यांनी सांगितले.

आळसणा रोडवरील विश्वनाथनगरातील रहिवासी पोहेकाँ श्री. चव्हाण गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई येथे कर्तव्यावर होते. आज सकाळी ते घरी परतले असता घराच्‍या मुख्य द्वाराचे कुलूप तुटलेले दिसले. लोखंडी सळई बाजूला पडलेली दिसली. त्यांनी घरात प्रवेश करून बघितले असता लोखंडी कपाटातील दागिने, साड्या, रोख साहित्य गायब झाल्याचे आढळले. त्यांनी फोनद्वारे शेगाव शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मात्र चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील श्री. चव्‍हाण यांचा मुलगा आणि सून घरी आल्यानंतर कळू शकणार आहे.

शेगावमध्ये पोलिसाचे घर फोडले!