शेगावमध्ये शिक्षकाचे घर फोडले, सोने-चांदीच्‍या दागिन्यांसह २ लाखांचा मुद्देमाल लंपास

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शेगाव शहरातील गणपतीनगरात २३ जूनच्या सकाळी समोर आली. चोरी झाली तेव्हा शिक्षक पत्नीसह उपचारकामी अकोल्याला होते. काल, २४ जूनला परतल्यानंतर त्यांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार त्यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आशिष किसनराव …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्‍या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शेगाव शहरातील गणपतीनगरात २३ जूनच्‍या सकाळी समोर आली. चोरी झाली तेव्‍हा शिक्षक पत्‍नीसह उपचारकामी अकोल्याला होते. काल, २४ जूनला परतल्यानंतर त्‍यांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

आशिष किसनराव नाचणे (32) गणपतीनगरात राहतात. ते वसाली (ता. संग्रामपूर) येथील जिल्‍हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. पत्‍नीच्‍या उपचारकामी ते 22 जूनच्‍या दुपारी 4 च्‍या सुमारास घराला व समोरील गेटला कुलूप लावून पत्‍नीसह दोन दिवसांसाठी गेले होते. 23 जूनला सकाळी साडेसातला अकोला येथे दवाखान्‍यात असताना त्‍यांना शेजारी राहणारे राजेंद्र बोर्डे व सुहास डुकरे यांनी फोन करून माहिती दिली की, तुमच्‍या घराचे समोरील लोखंडी गेटचे कुलूप लावलेले आहे, मात्र घराच्‍या दरवाजाला कुलूप दिसत नाही. त्‍यावर नाचणे यांनी त्‍यांना तात्‍पुरते तुमच्‍याकडील कुलूप लावून ठेवा, असे सांगितले.

काल, 24 जूनला दुपारी 1 च्‍या सुमारास ते घरी परतले. त्‍यांना बेडरूममध्ये कपडे, कागदपत्रे व अन्य सामान अस्ताव्यस्‍त पडलेले दिसले. ड्रेसिंग टेबलमधील सामान बाहेर पडलेले दिसले. घरातील लोखंडी कपाट उघडे दिसले. कपाटामधील सामानाची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले सोन्याचे डोरले व मणी (वजन 2. 33 ग्रॅम, किंमत 6582 रुपये), सोन्याची नथ (वजन 1.140 ग्रॅम, किंमत 3550 रुपये), सोन्याचे मंगळसूत्र (वजन 34. 640 ग्रॅम किंमत 97 हजार 338 रुपये), सोन्याचे कानातील (वजन 5 ग्रॅम किंमत 21 हजार रुपये), सोन्याचे कानातील झुंबर (वजन 5 ग्रॅम किंमत 15 हजार रुपये), सोन्याची अंगठी (वजन 5 ग्रॅम, किंमत 17 हजार रुपये), पत्नीच्‍या उपचारासाठी घरात ठेवलेले नगदी 45 हजार रुपये) असा एकूण 2 लाख 5 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले. तपास सहायक पोलीस निरिक्षक गौतम इंगळे करत आहेत.