शेगावमध्ये 153 ज्‍येष्ठांनी टोचून घेतली कोरोना लस!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावच्या सईबाई मोटे रुग्णालयात शहरातील 153 ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस कोव्हॅक्सिन टोचून घेतल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 30 ज्येष्ठ नागरिकांना लस टोचण्यात आली. 2 मार्च रोजी सुटी …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगावच्‍या सईबाई मोटे रुग्णालयात शहरातील 153 ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस कोव्‍हॅक्‍सिन टोचून घेतल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.

1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 30 ज्येष्ठ नागरिकांना लस टोचण्यात आली. 2 मार्च रोजी सुटी होती. 3 मार्चला 123 ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली. डॉ. पंडित म्हणाले, की ज्यांचे वय 45 ते 59 दरम्यान असतील व त्यांना आजार असेल अशा नागरिकांनी डॉक्टरांची चिठ्ठी आणून त्यांनाही वेक्सिन घेता येईल. ज्या नागरिकांनी आज व्हॅक्सिन घेतली आहे अशा ज्येष्ठ नागरिकांनी या लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर घेणे आवश्यक आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली.

गटनेत्‍यांनीही घेतली लस

शेगाव नगर परिषदेचे गटनेते शरद शेठ अग्रवाल यांनीही सपत्नीक लस टोचून घेतली. श्री. अग्रवाल यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना सांगितले, की शेगाव शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. आज मी सपत्नीक ही लस टोचून घेतली आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षात घेता सईबाई मोटे रुग्णालय प्रशासनाने आणखीन टेबल व रजिस्ट्रेशनची सुविधा वाढवावी. जेणेकरून या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना घेता येईल आणि दुसरे म्हणजे असे की शेगाव शहरात खूप हॉस्पिटल आहेत या खासगी दवाखान्यांनी सेवाभावी वृत्तीने ही सेवा सुरू करावी. जेणेकरून संपूर्ण शेगाव शहरातील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येईल, असे ते म्‍हणाले.