शेगावमध्ये 19 वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरातील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेगाव शहरातील दसरानगरात आज, 17 मार्चला सकाळी 11 च्या सुमारास समोर आली. वैभव शंकर धोटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वैभवचे वडील सकाळी शेतात गेले होते. काम करून 11 ला परत आले असता …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः 19 वर्षीय तरुणाने राहत्‍या घरातील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना शेगाव शहरातील दसरानगरात आज, 17 मार्चला सकाळी 11 च्‍या सुमारास समोर आली.

वैभव शंकर धोटे असे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वैभवचे वडील सकाळी शेतात गेले होते. काम करून 11 ला परत आले असता त्‍यांची बहीण वंदना यांनी सांगितले, की वैभवने गळफास घेतला आहे. वैभवने आत्‍महत्‍या का केली, हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नव्‍हते. त्‍याच्‍या वडिलांनाही याबाबत काहीच माहिती नाही. त्‍यांनी कुणावर संशयही व्‍यक्‍त केलेला नाही.