शेगाव नगर परिषद उपाध्यक्षपदी भाजपच्या सौ.सुषमा शेगोकार; महाविकास आघाडीचे शे.नईम पराभूत

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगर परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सौ. सुषमाताई नितीन शेगोकार यांनी महाविकास आघाडीचे शे.नईम शे.जमाल यांचा पराभव केला. एकूण 28 सदस्यांपैकी सुषमाताई शेगोकार यांना 19 तर शे.नईम यांना 7 सदस्यांची मते मिळाली. एक सदस्य तटस्थ तर एक सदस्य गैरहजर होता. नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाच्या माजी …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव नगर परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सौ. सुषमाताई नितीन शेगोकार यांनी महाविकास आघाडीचे शे.नईम शे.जमाल यांचा पराभव केला. एकूण 28 सदस्यांपैकी सुषमाताई शेगोकार यांना 19 तर शे.नईम यांना 7 सदस्‍यांची मते मिळाली. एक सदस्य तटस्थ तर एक सदस्य गैरहजर होता.

नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाच्या माजी उपाध्यक्षा सौ. ज्योतीताई कलोरे यांनी पक्षाच्या धोरणाला अनुसरून मागील महिन्यात राजीनामा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज, 22 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता उपाध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी न.प.च्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले सभागृहात निवडणूक घेण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. शकुंतलाताई बुच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणुकीच्या सभेत भाजपाकडून सौ. सुषमाताई नितीन शेगोकार यांनी तर महाविकास आघाडीकडून शे.नईम शे.जमाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रक्रियेचे कामकाज साहाय्यक अधिकारी म्हणून आर.बी.ठाकरे यांनी पाहिले. हात उंचावून पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार सुषमाताई शेगोकार यांच्या बाजूने 19 सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला तर महाविकास विकास आघाडीचे शे.नईम यांना 7 सदस्यांनी समर्थन दिले. एमआयएमचे मो.वसीम पटेल यांनी तटस्थ भूमिका ठेवली. तर भाजपच्या नगरसेविका सौ.वर्षाताई ढमाळ सभेला गैरहजर होत्या. विजयी उमेदवार सौ. सुषमाताई नितीन शेगोकार यांना त्यांच्या स्वत:च्या मतासह भाजपाच्या सौ. रजनीताई अरूण पहुरकर, सौ.ज्योतीताई सत्यनारायण कचरे, राजेश साहेबराव कलोरे, सौ.ज्योतीताई संजय कलोरे, श्रीमती गंगुबाई विष्णू खंडारे, गजानन जगन्‍नाथ जवंजाळ, पवन महाराज भिकुलाल शर्मा, सौ. ज्योतीताई अशोक चांडक, सौ. मंगलाताई कमलाकर चव्हाण, शरद शंकरलाल अग्रवाल, सौ. रत्नमालाताई सुरेश ठवे, सौ. अलकाताई संजय खानझोडे, खैरून्निसा शे.चांद, सौ.मालाताई विनायक देशमुख, मंगेश ढगे यांच्यासह शिवसेनेच्या सौ.छायाताई योगेश पल्हाडे, आशिष दामोदर गणगणे, शैलेश बसंतसिंग डाबेराव यांनी हात उंचावून मतदान केले. महाविकास आघाडीचे शे.नईम शे.जमाल यांना शिवसेनेचे दिनेश लक्ष्मणराव शिंदे, विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुलाबराव ठाकरे, सौ.रझियाबी फाजल शाह, सौ.शारदाताई रवींद्र रायणे, रा.काँ.चे शैलेश जयंतराव पटोकार, भारिपबमसंच्या सौ.प्रितीताई राजेंद्र शेगोकार यांनी हात उंचावून मतदान केले.

भारिप-बमसं महाविकास आघाडीसोबत कायम
निवडणुकीत भारिपबमसंच्या सौ.प्रितीताई राजेंद्र शेगोकार यांच्‍या निर्णयाकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा दर्शवून आघाडी धर्म निभावल्याचे दिसून आले.

शिवसेनेत फूट
शिवसेनेच्या चारपैकी तीन सदस्यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केले तर दिनेश शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याने शिवसेनेत फूट दिसून आली.

एमआयएम तटस्थ
एमआयएमचे नगरसेवक मो.वसीम पटेल निवडणुकीत तटस्थ राहले.

विशेष म्हणजे शेगाव नगर परिषदेचा अध्यक्ष हा जनतेतून निवडण्यात आला असून सौ. शकुंतलाताई बुच मागील सव्वा चार वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून विराजमान आहेत. मागील सव्वाचार वर्षांत महिलाराज शेगाव नगर परिषदेवर दिसून आले. अध्यक्षासह अर्ध्याच्या वर समित्या या आतापर्यंत महिलांकडे होत्या. चारही उपाध्यक्ष आतापर्यंत महिलाच राहिलेले आहेत. प्रथम वर्षी सौ. वर्षाताई दीपक ढमाळ, सौ. ज्योतीताई कचरे, सौ. ज्योतीताई संजय कलोरे व आताच्या विद्यमान उपाध्यक्ष सौ. सुषमाताई नितीन शेगोकार आहेत. भाजपा गटनेते शरदसेठ अग्रवाल, पांडुरंग बुच, विजयबाप्पू देशमुख, प्रदिप सांगळे, गजानन जवंजाळ, दीपक ढमाळ, पाणी पुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, आरोग्य सभापती सौ. मंगलाताई कमलाकर चव्हाण, बांधकाम सभापती राजेंद्र कलोरे, महिला बाल कल्याण सभापती सौ. मंगलाताई देशमुख, शिक्षण सभापती शैलेश डाबेराव,सौ वर्षाताई ढमाळ, ज्योतीताई चांडक, रत्नमाला ठवे, रजनीताई पहुरकर, ज्योतीताई कचरे, आतिष सुरवाडे आदींनी नवनिर्वाचित उपाध्यक्षा सुषमा नितिन शेगोकार यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.