शेगाव पंचायत समितीचा लाचखोर शाखा अभियंता जाळ्यात; कंत्राटदाराकडून घेतले ७ हजार

शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हायमास्ट दिवे बसविल्याचे बिल काढून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शेगाव पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, 23 फेब्रुवारीला पंचायत समितीत रंगेहात पकडले. पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड (57) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सांगावा (ता. शेगाव) येथील 42 वर्षीय …
 

शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हायमास्‍ट दिवे बसविल्‍याचे बिल काढून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्‍वीकारणाऱ्या शेगाव पंचायत समितीच्‍या शाखा अभियंत्‍याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने आज, 23 फेब्रुवारीला पंचायत समितीत रंगेहात पकडले. पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड (57) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

सूत्रांच्‍या माहितीनुसार, सांगावा (ता. शेगाव) येथील 42 वर्षीय कंत्राटदाराने एकफळ येथे अनुसूचित जाती नवबौत्र घटकांच्‍या वस्‍तीचा विकास करणे योजनेअंतर्गत हायमास्‍ट दिवे बसवले होते. हे काम 2020 रोजी पूर्ण झाले. केलेल्या कामाचे बिल 1 लाख 43 हजार 700 रुपये झाले. त्‍याची 5 टक्‍के रक्‍कम 7500 रुपये लाचेची मागणी शाखा अभियंता पुरुषोत्तम गायकवाड याने केली होती. मात्र लाच देण्याची इच्‍छा नसल्याने कंत्राटदाराने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शेगाव पंचायत समितीत आज सापळा रचला. तडजोडीअंती 7 हजार रुपयांची लाच स्‍वीकारताना पुरुषोत्तम गायकवाड याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आर. एन. मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी, विजय मेहेत्रे, चालक पो. शि. अर्शद शेख यांनी विशाल गायकवाड
(पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र), अरुण सावंत (अप्‍पर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र, संजय चौधरी (पोलीस उप अधीक्षक लचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा) यांच्‍या मार्गदर्शनाखाली केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्‍यक्‍तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा संपर्क क्रमांक – 8888768218 / 9923406509
टोल फ्री क्रमांक – 1064.