शेजारणीच्या डोक्यात घातली बॅट; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कपडे वाळत घालण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन एकाने शेजारणीच्या डोक्यात बॅट घातली. ही घटना आज, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी देऊळगाव घुबे (ता. चिखली )येथे घडली. विवाहित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून अर्जुन जोरसिंग जाधव (४०, रा. देऊळगाव घुबे, ता. चिखली) याच्याविरुद्ध अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप भाऊराव सावंत (रा. देऊळगाव …
 
शेजारणीच्या डोक्यात घातली बॅट; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कपडे वाळत घालण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन एकाने शेजारणीच्या डोक्यात बॅट घातली. ही घटना आज, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी देऊळगाव घुबे (ता. चिखली )येथे घडली. विवाहित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून अर्जुन जोरसिंग जाधव (४०, रा. देऊळगाव घुबे, ता. चिखली) याच्याविरुद्ध अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रदीप भाऊराव सावंत (रा. देऊळगाव घुबे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि जाधव एकाच घरमालकाचे भाडेकरू आहेत. आज सकाळी सावंत यांची पत्नी कपडे वाळत घालत असताना त्यांचा कपडे वाळत घालण्याच्या जागेवरून अर्जुन जाधव यांचा वाद झाला. अर्जुन जाधव यांनी रागाच्या भरात घरातून बॅट आणून सावंत यांच्या पत्नीच्या डोक्यात टाकली. त्यामुळे त्या जखमी झाल्या. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पोहेकाँ कैलास उगले करीत आहेत.