शेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्‍याने मध्यरात्री विष घेतले!; उपचारादरम्‍यान मृत्‍यू, चिखली तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेजारच्यांच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने विष घेतले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना चांधई (ता. चिखली) येथे २० जुलैच्या पहाटे घडली. या प्रकरणी आज, २४ जुलैला मृतकाच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शेजारच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भगवान सुखदेव गवई असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. साधना भगवान …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेजारच्यांच्या छळाला कंटाळून एका व्‍यक्‍तीने विष घेतले. उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला. ही घटना चांधई (ता. चिखली) येथे २० जुलैच्‍या पहाटे घडली. या प्रकरणी आज, २४ जुलैला मृतकाच्‍या पत्‍नीने चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शेजारच्या तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

भगवान सुखदेव गवई असे मृत्‍यू झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. साधना भगवान गवई (३९, रा. केंद्रीय मराठी शाळेजवळ, चांधई) या महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिला दोन मुली व एक मुलगा आहे. भगवान आणि साधना यांच्‍या घराशेजारी सुनिता प्रकाश बनकर ही तिचा प्रकाश शाहू बनकर व मुलगा आनंद यांच्यासोबत राहते. बनकर कुटुंबिय सतत काही ना काही कारणावरून गवई कुटुंबाशी भांडण करत होते. मोटारसायकल गल्लीतून आणायची नाही असे म्‍हणून सुनिता बनकर ही भगवान गवईंना शिविगाळ करायची. त्यामुळे भगवान गवई सतत मानसिक तणावाखाली राहत होते. या बाईमुळे एखाद्या दिवशी आत्महत्या करून घेईल, तेव्हाच माझी या त्रासातून सुटका होईल, असे ते पत्‍नीकडे बोलायचे. १९ जुलैला सकाळी सहाला भगवान गवई घरासमोरील नळाचे पाणी भरत असताना सुनिता बनकर तेथे आली. तुझ्या नळाचे पाणी जर आमच्या अंगणात आले तर तुझा बाप साफ करून देणार आहे का, असे म्‍हणाली. तेव्हा गवईंनी तिला माझे पाणी भरून झाल्यावर तुमचे अंगण झाडून काढून देईन, असे सांगितले. मात्र तिने त्‍यांची कॉलर धरली व त्यांना थापडबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. पतीचा आवाज आल्याने साधना गवईसुद्धा धावत बाहेर आली. त्‍याचवेळी सुनिताचा पती प्रकाश व त्यांचा मुलगा आनंद हेही धावून येत त्‍यांनी भगवान गवईंना मारहाण करायला सुरुवात केली. साधना त्‍यांना वाचवायला धावली असता तिलाही मारहाण करण्यात आली.

…अन्‌ उचलले टोकाचे पाऊल!
दोन वर्षांपासून बनकर कुटुंबाकडून सतत त्रास होत असल्याने भगवाई गवईंनी विष घेतले. २० जुलैला पहाटे (मध्यरात्री) दोनला त्‍यांनी साधना यांना झोपेतून उठवले व सुनिता बनकर, प्रकाश बनकर व आनंद बनकर यांच्या सतत त्रासाला कंटाळून विष घेतल्‍याने सांगितले. साधना यांनी तातडीने त्‍यांना चिखलीच्‍या सरकारी रुग्‍णालयात आणले. मात्र प्रकृती बिघडल्‍याने बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान भगवान गवई यांचा दुपारी १२ वाजता मृत्यू झाला.