शेजाऱ्यांशी मिळून पत्‍नीचा वेश्याव्यवसाय, मुलीलाही धंद्यात ओढले!; मलकापूरच्‍या शेतमजुराचा “एसीपीं’कडील तक्रारीत धक्‍कादायक आरोप

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूरच्या सालीपुरा भागातील एका ५० वर्षीय व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धक्कादायक तक्रार केली आहे. शेजाऱ्यांशी मिळून पत्नी वेश्याव्यवसाय करत असून, त्यांच्या १८ वर्षीय मुलीलाही त्यांनी या धंद्यात ओढले आहे. तिचे अश्लील फोटो काढून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप त्याने पत्नीसह शेजारच्या ४ लोकांविरुद्ध केला आहे. या प्रकरणात या …
 
शेजाऱ्यांशी मिळून पत्‍नीचा वेश्याव्यवसाय, मुलीलाही धंद्यात ओढले!; मलकापूरच्‍या शेतमजुराचा “एसीपीं’कडील तक्रारीत धक्‍कादायक आरोप

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूरच्‍या सालीपुरा भागातील एका ५० वर्षीय व्‍यक्‍तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धक्‍कादायक तक्रार केली आहे. शेजाऱ्यांशी मिळून पत्‍नी वेश्याव्यवसाय करत असून, त्‍यांच्या १८ वर्षीय मुलीलाही त्‍यांनी या धंद्यात ओढले आहे. तिचे अश्लील फोटो काढून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप त्‍याने पत्‍नीसह शेजारच्‍या ४ लोकांविरुद्ध केला आहे. या प्रकरणात या व्‍यक्‍तीने यापूर्वीही पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. प्रकरण एकूणच किचकट असल्याने खरे कोण, खोटे कोण हे कळायला मार्ग नाही. मात्र या व्‍यक्‍तीच्‍या तक्रारीत तथ्य असेल तर गंभीर बाब असून, यादृष्टीने पोलिसांनी तपास करून सत्‍य शोधायला हवे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे.

आपल्याला जेवणात बेशुद्ध करण्याच्‍या गोळ्या खाऊ घालून, इंजेक्‍शन देऊन घरातच वेश्या व्यवसाय केला जात असल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. आमचा चालू असलेला व्यवसाय तू बंद केला तर तुला जीवे मारून टाकू. आमचे मोठमोठ्या व्‍यक्‍तींशी संबंध आहेत. आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही अशा धमक्या दिल्या जात असल्याचे या व्यक्‍तीने म्‍हटले आहे. या प्रकरणात या व्‍यक्‍तीचा लहान भाऊ काही वर्षांपासून बेपत्ता झाला असल्याचेही त्‍याचे म्‍हणणे आहे. त्‍याला ९ वर्षीय मुलगी असून, तिच्‍यावरही अत्‍याचार होण्याची भीती या शेतमजूर असलेल्या व्‍यक्‍तीने व्‍यक्‍त केली आहे. तक्रारीच्‍या अनुषंगाने सखोल चौकशी होण्याची गरज आहे.