शेजाऱ्याची महिलेला लोटपोट, पतीच्‍या डोक्‍यात घातली काठी; माळविहीर येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर बकरी आल्याने शेजाऱ्याने विवाहितेला लोटपोट केली. याचा जाब विचारणाऱ्या तिच्या पतीलाही मारहाण करत डोक्यात काठी घातली. ही घटना माळविहीर (ता. बुलडाणा) येथे १६ जुलैला रात्री ९ च्या सुमारास घडली. प्रकाश विठोबा बनगाळे (४३, रा. माळविहीर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्यांची घरासमोर बांधलेली बकरी सुटली होती. ती गणेश दिनकर …
 
शेजाऱ्याची महिलेला लोटपोट, पतीच्‍या डोक्‍यात घातली काठी; माळविहीर येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर बकरी आल्याने शेजाऱ्याने विवाहितेला लोटपोट केली. याचा जाब विचारणाऱ्या तिच्‍या पतीलाही मारहाण करत डोक्‍यात काठी घातली. ही घटना माळविहीर (ता. बुलडाणा) येथे १६ जुलैला रात्री ९ च्‍या सुमारास घडली.

प्रकाश विठोबा बनगाळे (४३, रा. माळविहीर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यांची घरासमोर बांधलेली बकरी सुटली होती. ती गणेश दिनकर वैद्य याच्‍या घरासमोर गेली. त्‍यामुळे सविता प्रकाश बनगाळे बकरी धरून बांधण्यासाठी तिथे गेली असता गणेश वैद्यने तिला लोटपाट केली. तिचा आवाज ऐकून बनगाळे घराबाहेर आले व पत्नीला लोटपाट का केली, असे वैद्यला विचारले. तेव्हा वैद्यने त्‍यांना शिविगाळ, मारहाण करत डोक्यात काठी घातली. यात बनगाळे यांच्‍या डोक्याला जखम झाली. त्‍यांच्‍या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, तपास पोहेकाँ दत्तात्रय नागरे करत आहेत.