शेण घ्यायला आलेल्या विवाहितेकडे शरीरसंबंधाची मागणी!; गोठा मालकाचा प्रताप; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर सारवण्यासाठी शेण आणायला गेलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा गोठामालकाने विनयभंग केला. ही घटना काल, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास उमरा (ता. खामगाव) येथे घडली. उमरा येथील २५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, काल सकाळी शेण आणण्यासाठी गावातीलच ज्ञानेश्वर सावजी मापारी यांच्या वाडग्यात गेली होती. ती शेण उचलत असताना आरोपी ज्ञानेश्वरने …
 
शेण घ्यायला आलेल्या विवाहितेकडे शरीरसंबंधाची मागणी!; गोठा मालकाचा प्रताप; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर सारवण्यासाठी शेण आणायला गेलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा गोठामालकाने विनयभंग केला. ही घटना काल, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास उमरा (ता. खामगाव) येथे घडली.

उमरा येथील २५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, काल सकाळी शेण आणण्यासाठी गावातीलच ज्ञानेश्वर सावजी मापारी यांच्या वाडग्यात गेली होती. ती शेण उचलत असताना आरोपी ज्ञानेश्वरने तिला वाईट उद्देशाने मागून घट्ट पकडले व शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता आरोपीने तिला चापटा मारल्या. ही हकीकत विवाहितेने पतीला सांगितली असता जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला ज्ञानेश्वर व त्याच्या भावाने खल्लास करून टाकू, अशी धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी ज्ञानेश्वर सावजी मापारी व शिवशंकर उर्फ पप्पू सावजी मापारी (२०, दोघेही रा. उमरा ,ता खामगाव)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.