शेतकर्‍याला जिलेबी पडली 1 लाखात!; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिलेबीची किंमत ती काय? दहा रुपये प्लेट फार फार तर… पण मलकापूरमध्ये एका शेतकर्याला एक प्लेट जिलेबी चक्क 1 लाख रुपयांना पडली. जिलेबी खाण्याच्या मोहापायी त्यांना 1 लाख रुपये गमवावे लागले. एकीकडे ते जिलेबीवर ताव मारत असताना दुसरीकडे चोरट्यांनी दुचाकीला लटकवलेली 1 लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ही घटना …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिलेबीची किंमत ती काय? दहा रुपये प्लेट फार फार तर… पण मलकापूरमध्ये एका शेतकर्‍याला एक प्लेट जिलेबी चक्क 1 लाख रुपयांना पडली. जिलेबी खाण्याच्या मोहापायी त्यांना 1 लाख रुपये गमवावे लागले. एकीकडे ते जिलेबीवर ताव मारत असताना दुसरीकडे चोरट्यांनी दुचाकीला लटकवलेली 1 लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ही घटना मलकापूर शहरातील हनुमान चौकात 5 फेब्रुवारीला घडली.
धामणगाव बढे येथील शेतकरी रामकृष्ण लक्ष्मण मापारी यांच्यावर हे संकट ओढावले. झाले असे, की त्यांनी त्यांचा मका मलकापूर येथे विक्रीसाठी आणला होता. मका विक्रीनंतर त्यांना मिळालेले 1 लाख रुपये ते शहरातील महेश अर्बन बँकेत भरण्यासाठी जात होते. मात्र रस्त्यातच हरियाणाची जिलेबी दिसली अन् त्यांनी गाडी थांबवली. हरियाना जिलेबी सेंटरमध्ये जिलेबीवर ताव मारत असताना चोरट्यांनी 1 लाख रुपयांची बॅगच लांबवली. जिलेबी खाऊन दुचाकीजवळ आले. पाहतात तर बॅगच गायब. त्यांनी तातडीने मलकापूर शहर पोलीस गाठे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोध मोहीम हाती घेत चोरट्यांचा तपास केला. मात्र आज 7 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत तरी चोरटे सापडले नव्हते.