शेतकऱ्यांनो सावधान…जिल्ह्यात 10, 11, 12 मार्चला पावसाची शक्यता

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 10, 11 आणि 12 मार्चला हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलडाणा जिल्हयात 10,11 व 12 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 10, 11 आणि 12 मार्चला हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलडाणा जिल्हयात 10,11 व 12 मार्च  रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. 12 मार्चला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता आहे. या दरम्यान शेतकऱ्यांनी स्वत:ची व पशुधनाची काळजी घ्यावी. परिपक्व झालेल्या पिकांची त्वरित कापणी करावी व कापणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. साठवणूक करणे शक्य नसल्यास शेतातील शेतमाल प्लास्टिक शीटने झाकून ठेवावा. जेणेकरून अवकाळी पावसापासून शेतमाल खराब होणार नाही, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले आहे.