शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी… जिल्ह्यात आज, उद्या, परवा मुसळधार पाऊस! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीने आधीच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असताना परतीचा पाऊसही उरले सुरले घेऊन जातो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज, १६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून १८ ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुसळधार पावसासोबत विजांचा गडगडाट होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वृत्त लिहीत असताना …
 
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी… जिल्ह्यात आज, उद्या, परवा मुसळधार पाऊस! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीने आधीच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असताना परतीचा पाऊसही उरले सुरले घेऊन जातो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज, १६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून १८ ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुसळधार पावसासोबत विजांचा गडगडाट होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वृत्त लिहीत असताना बुलडाणा, धाड, खामगाव व संग्रामपूर तालुक्यातील काही गावे, तसेच चिखली परिसरात विजांचा गडगडासह पावसाला सुरुवात झाली होती. सध्या शेतकऱ्यांचा सोयाबीन सोंगणीचा व काढणीचा हंगाम आहे. अतिवृष्टीने आधीच ९० टक्‍के पीक हिरावले गेले आहे. आता उरले सुरले पीकही हातातून जाण्याची भीती आहे. नुकसान टाळण्यासाठी कापणी केलेले सोयाबीन सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे, असे आवाहन कृषी हवामान केंद्र बुलडाणाचे मनिष येदुलवार यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना केले.