शेतकऱ्याचे घर फोडून ५६ हजारांचा मुद्देमाल लंपास!; सिंदखेड राजा तालुक्‍यातील घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गच्चीवरून घरात शिरत चोरट्याने दागदागिन्यांसह रोख रुपये असा ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना झोटिंगा (ता. सिंदखेड राजा) येथे काल, ११ ऑक्टोबरला सकाळी समोर आली. ३२ वर्षीय शेतकऱ्याने बिबी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. प्रविण दादाराव डिघोळे (रा. झोटिंगा) …
 
शेतकऱ्याचे घर फोडून ५६ हजारांचा मुद्देमाल लंपास!; सिंदखेड राजा तालुक्‍यातील घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गच्‍चीवरून घरात शिरत चोरट्याने दागदागिन्यांसह रोख रुपये असा ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना झोटिंगा (ता. सिंदखेड राजा) येथे काल, ११ ऑक्‍टोबरला सकाळी समोर आली. ३२ वर्षीय शेतकऱ्याने बिबी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्‍यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आले आहे.

प्रविण दादाराव डिघोळे (रा. झोटिंगा) यांनी तक्रार दिली, की ते शेतात झोपले असताना पहाटे साडेपाचला त्‍यांच्‍या वडिलांनी फोन करून त्‍यांना घरात चोरी झाल्याचे सांगितले. चोरट्यांनी गच्‍चीवरून घरात शिरत रोख ४५ हजार रुपये, मुलाच्या सोनाच्या बाळ्या २ ग्रॅम (किंमत ३ हजार रुपये), सोन्याचा आेम २ ग्रॅम (किंमत ३ हजार रुपये), पाकिटात ठेवलेले ५ हजार रुपये असा एकूण ५६ हजार रुपयांचा माल चोरून नेला.