शेतजमिन मोजायला आलेल्या पथकावर दगडांनी हल्ला; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिंगणा कारेगाव (ता. खामगाव) येथे शेतमोजणीचे काम सुरू असताना सरकारी पथकावर हल्ला करणाऱ्या तिघांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेप्रकरणी काल, 23 फेब्रुवारीला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी खामगाव भूमीअभिलेख विभागाचे उपअधीक्षक नीलेश राजमाने यांनी तक्रार केली. …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हिंगणा कारेगाव (ता. खामगाव) येथे शेतमोजणीचे काम सुरू असताना सरकारी पथकावर हल्ला करणाऱ्या तिघांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेप्रकरणी काल, 23 फेब्रुवारीला अधिकाऱ्याच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी खामगाव भूमीअभिलेख विभागाचे उपअधीक्षक नीलेश राजमाने यांनी तक्रार केली. त्‍यावरून सुधाकर शिवराम पानझाडे, अक्षय सुधाकर पानझाडे, गजानन पांडुरंग पानझाडे (सर्व रा. हिंगणा कारेगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. सरकारी पथक पोलीस बंदोबस्‍तात अर्जदार त्र्यंबक पानझाडे यांच्‍या शेतीची मोजणी करण्यासाठी गेले असता आरोपींनी दगडे घेऊन अंगावर धावून आले. शेतमोजणीचे काम बंद पाडले. तपास एएसआय आनंद वाघमारे करत आहेत. हा गुन्‍हा पोहेकाँ शिवाजी दळवी यांनी दाखल करून घेतला.