शेततळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू; देऊळगाव राजा तालुक्यातील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेततळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. तिसऱ्या मुलाला वाचवण्यात यश आले. ही घटना आज, ७ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास वाकी बुद्रूक (ता. देऊळगाव राजा) शिवारात घडली. अमरदीप शंकर बनसोडे (१४) व सोहम परमेश्वर बनसोडे (१२) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. सुमित परमेश्वर बनसोडे (१४) हा बचावला आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेततळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. तिसऱ्या मुलाला वाचवण्यात यश आले. ही घटना आज, ७ जुलैला दुपारी बाराच्‍या सुमारास वाकी बुद्रूक (ता. देऊळगाव राजा) शिवारात घडली.

अमरदीप शंकर बनसोडे (१४) व सोहम परमेश्वर बनसोडे (१२) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. सुमित परमेश्वर बनसोडे (१४) हा बचावला आहे. अमरदीप, सोहम आणि सुमित हे तिघे भावंडं पोहण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. पोहताना अमरदीप आणि सोहम दोघेही बुडाले. त्यांना वाचविण्याच्‍या प्रयत्नात सुमितसुद्धा बुडायला लागला. त्याने आरडा ओरड केल्याने आजूबाजूच्या शेतातील शेतकरी धावून आले. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले. मात्र तोपर्यंत अमरदीप आणि सोहमचा मृत्यू झाला होता.

अमरदीप आणि सोहमचे मृतदेह देऊळगाव महीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत तर सुमित अस्वस्थ झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. अमरदीप देऊळगाव मही येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात नवव्या वर्गात शिकत होता तर सोहम वाकी बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेतील सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होता. सोहम आणि परमेश्वर हे दोन सख्खे भावंडं होती तर अमरदीप त्यांचा चुलत भाऊ होता.