शेतरस्त्याचा कालवा म्‍हणून वापर!; शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी लिहिले सीएमना पत्र!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेरा खुर्द (ता. चिखली) येथे खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यासाठी पाटबंधारे विभागाने जमीन अधिग्रहित केली होती. मात्र अधिग्रहित केलेल्या जमिनीऐवजी शेतरस्त्याचा वापरच कालवा म्हणून केला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मेरा खुर्दच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. शेतनालीतच कालव्याचे बांधकाम केल्याने शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेरा खुर्द (ता. चिखली) येथे खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यासाठी पाटबंधारे विभागाने जमीन अधिग्रहित केली होती. मात्र अधिग्रहित केलेल्या जमिनीऐवजी शेतरस्त्याचा वापरच कालवा म्हणून केला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मेरा खुर्दच्‍या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

शेतनालीतच कालव्याचे बांधकाम केल्याने शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी वाट नसल्याने ३० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहते. त्‍यामुळे होणाऱ्या नुकसानीला लघु पाटबंधारे विभागच सर्वस्वी जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिग्रहित केलेल्या जमिनीवरच आता शेतरस्ता व नाली देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास २६ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही ज्ञानेश्वर भुसारी, प्रकाश भुसारी, भास्कर भुसारी, बाजीराव भुसारी, तेजराव भुसारी, सुधाकर भुसारी, परमेश्वर भुसारी, प्रकाश भुसारी, उमेश भुसारी, नीलेश भुसारी, गजानन भुसारी, नंदकिशोर भुसारी, दिनकर शेळके, शंकर शेळके, संदीप शेवाळे, रईस देशमुख, मतीन देशमुख, जावेद देशमुख, नंदू वराडे, रमेश वराडे या शेतकऱ्यांनी दिला आहे.