शेतातील निंबाच्‍या झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्‍महत्‍या, नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना नवे जिगाव (ता. नांदुरा) शिवारात १४ ऑगस्टला घडली. भानुदास वसंत श्रीनाथ असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.रामदास नारायण श्रीनाथ यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ते त्यांच्या पुतण्याच्या शिवारात गेले असता त्यांना भानुदासने आत्महत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांनी आकस्मिक …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील निंबाच्‍या झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय युवकाने आत्‍महत्‍या केली. ही घटना नवे जिगाव (ता. नांदुरा) शिवारात १४ ऑगस्‍टला घडली. भानुदास वसंत श्रीनाथ असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे.
रामदास नारायण श्रीनाथ यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ते त्‍यांच्‍या पुतण्याच्‍या शिवारात गेले असता त्‍यांना भानुदासने आत्‍महत्‍या केल्याचे दिसून आले. पोलिसांनी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली असून, तपास सुरू केला आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. मानकर, पोलीस कर्मचारी मनोहर बोरसे, संदीप ढोले करत आहेत.